आ. पाटील यांच्याकडून रस्त्यांची पाहणी : नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा

पारोळा प्रतिनिधी । आ.चिमणराव पाटील यांनी अधिकाऱ्यांसमवेत करंजी ते बोळे पर्यंत रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेची पाहणी केली असता ग्रामस्थांनी रस्त्यामुळे उद्भवलेल्या समस्यांचा पाढाच वाचला. 

करंजी ते बोळे रस्त्यावरील करंजी, मुंदाणे, सोके, वसंतनगर, शेवगे प्र.ब.,बोळे ह्या गावातील ग्रामस्थांनी रस्त्यामुळे उदभवलेल्या समस्यांचा पाढाच वाचला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना रस्त्याची झालेली दुरावस्था व अधिकाऱ्यांनी केलेले दुर्लक्ष याबाबत जाब विचारून त्वरीत ह्या रस्त्याची सुधारणा करून संबंधित ग्रामस्थांची होत असलेली गैरसोय तातडीने सोडविण्यासाठी सुचना केल्या. ह्या कामाला लागणाऱ्या निधीला शासन स्तरावर सर्वोतोपरी प्रयत्न करून आणि पाठपुरावा करून आणणार असल्याचे ठोस आश्वासन आमदार चिमणराव पाटील यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिले.

याप्रसंगी मा.जि.प. सदस्य डॉ.दिनकर पाटील, शेतकी संघ व्हा.चेअरमन सखाराम चौधरी, पारोळा बाजार समिती उपसभापती दगडुबापु पाटील, कार्यकारी अभियंता सा.बां. अमळनेर एस.एस. राजपुत, सहाय्यक अभियंता श्रेणी १ सा.बां. उपविभाग पारोळा आर. बी. बाविस्कर, शाखा अभियंता सा.बां. उपविभाग पारोळा व्ही.ए. अहिरराव, कार्यकारी अभियंता जि.प. बांधकाम विभाग जळगांव शरद येवले, उपविभागीय अभियंता जि.प. बांधकाम उपविभाग एरंडोल एस.एस.पाटील, तसेच करंजी, मुंदाणे, सोके, वसंतनगर, शेवगे प्र.ब.,बोळे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Protected Content