गिरणा धरणाचे पाणी दस्केबर्डी व खेडी इंझारे धरण, वड्या धरणात सोडावे – खा. उन्मेशदादा पाटील

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गिरणा धरणाचे पाणी डाव्या कालव्याद्वारे दस्केबर्डी व खेडी इंझारे धरण, वड्या धरणात सोडावे अशी मागणी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

 

सध्या स्थितीत गिरणा धरण हे शंभर टक्के पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे हजारो क्युसेस पाणी नदीत सोडण्यात आलेले आहे. परंतु तेच पाणी डावा कालव्याद्वारे दस्केबर्डी येथील इंझारे धरण, वड्या धरण तसेच लहान मोठे वीस बावीस केटी बांध  भरल्यास त्या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा प्रमाणावर येणाऱ्या काळात फायदा होणार आहे. यासाठी तातडीने  गिरणा धरणाचे पाणी डाव्या कालव्याद्वारे दस्केबर्डी व खेडी इंझारे धरण, वड्या धरणात सोडावे अशी मागणी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

आज दस्केबर्डी येथील कार्यकर्ते राज महाजन, विनोद अहिरे, नरेश अहिरे, छोटू अहिरे पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील आदींनी  खासदार उन्मेशदादा पाटील यांची भेट घेऊन वरील मागणी करण्याची विनंती केली होती.   यावेळी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करीत तातडीने पाणी सोडावे.अशी सुचना केली. याबाबत खासदार उन्मेशदादा पाटील यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

वास्तविक दस्केबर्डी परिसरासह त्या भागात पाऊस कमी झाल्यामुळे नाले व केटी बांध वगैरे कोरडे आहेत. त्यामुळे सदरील नदीद्वारे सोडलेले अतिरिक्त जाणारे पाणी हे कालव्याद्वारे दस्केबर्डी परिसरातील धरण, नाले, केटीबांध  भरल्यास भविष्यात गुराढोरांसह शेतीला पाणी मिळेल तरी सदरील बाब लक्षात घेता गिरणा धरणातील पाणी कालव्याद्वारे संबंधित दस्केबर्डी व खेडी परीसरात सोडण्यात यावे अशी मागणी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांच्याकडे केली आहे.

Protected Content