दोघांच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची विष घेवून आत्महत्या

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ट्रॅक्टरचा कर्जाचा बोजा शेतावर बसवलेला असल्याने कर्ज भरणा केल्याने दिलेल्या दोन जणांच्या त्रासाला कंटाळून एकाने विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बादळ बुद्रुक येथे समोर आली आहे. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाल्मीक वामन पाटील (वय-५०) रा. चुंचाळे ता. पाचोरा ह.मु. भडगाव असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाल्मिक पाटील हे आपल्या कुटुंबियांसह भडगाव येथे वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. चुंचाळे गावातील रतन बळीराम पाटील आणि योगेश रतन पाटील या दोघांनी मयत वाल्मीक पाटील यांच्या शेतातवर ट्रॅक्टरचा कर्जाचा बोजा बसवलेला होता. दोघांनी ट्रॅक्टर साठीचे घेतलेले कर्जाची परत फेड न केल्याने वाल्मीक पाटील यांनी तगादा लावला होता. दरम्यान, रतन बळीराम पाटील आणि योगेश रतन पाटील यांच्यांकडे पैशांसाठी विनवण्या केल्या. त्यांनी कुठेलेही पैसे भरलेले नाही. या त्रासाला कंटाळून वाल्मिक पाटील यांनी रतन बळीराम पाटील यांच्या बाळद बुद्रुक शेत शिवारात विषारी औषध घेवून आत्महत्या केली. दरम्यान पाचोरा पोलीसांना या घटनेची माहिती देण्यात आली. मयताची पत्नी सुरेखा वाल्मीक पाटील यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी रतन बळीराम पाटील आणि योगेश रतन पाटील दोन्ही रा. चुंचाळे ता. पाचोरा जि.जळगाव ह.मु. गाडगेबाबा नगर, पाचोरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे करीत आहे.

Protected Content