अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील कोल्हेनगर भागातून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर रामानंदनगर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ट्रॅक्टरसह एक ब्रॉस वाळू जप्त करण्यात आली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव शहरातील कोल्हनगरात भागात शारदार आश्रम शाळा परिसरातील रस्त्यावरुन वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षक शिल्पा पाटील यांना मिळाली, त्यानुसार त्यांनी कर्मचाऱ्यांना कारवाईच्या सुचना दिल्या. कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास या परिसरातून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या एम.एच. १९, सी.झेड ५९५५ या क्रमाकांच्या ट्रॅक्टरवर कारवाई केली. कारवाईत पोलिसांनी ट्रॉलीसह ट्रॅक्टर व वाळू जप्त केली आहे. याप्रकरणी  पोलीस शिपाई सुरेश पवार यांच्या फिर्यादीवरुन ट्रॅक्टरवरील चालक बजानन गौरव वाघ रा. सावखेडा व ट्रॅक्टरमालक या दोन जणांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र तावडे हे करीत आहेत.

Protected Content