‘बेटी बचाव, बेटी पढाव’ अभियानाच्या शहराध्यक्षपदी गुणवंती चौधरी

यावल प्रतिनिधी । येथे भारतीय जनता पार्टीच्या कोर कमेटीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच संपन्न झाली असून यात ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या अभियानाच्या यावल तालुका अध्यक्षपदी वंदना फेगडे तर यावल  शहराध्यक्षपदी गुणवंती चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.

सदरची नियुक्ती यावल येथे संपन्न झालेल्या पक्षाच्या बेठकीत भारतीय जनता पक्षाचे यावल तालुकाध्यक्ष उमेश रेवा फेगडे यांनी केली. या प्रसंगी ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष हेमराज फेगडे, भाजपा तालुका सरचिटणीस विलास चौधरी, शहराध्यक्ष निलेश गडे, तत्काकालीन नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे, शहरउपाध्यक्ष योगेश चौधरी, शहरउपाध्यक्ष राहुल बारी, यावल शहर सरचिटणीस  परिष नाईक, युवा मोर्चा शहराध्यक्ष रितेश बारी, पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते वसंत बापू भोसले,  भुषण फेगडे यांची या बैठकीत उपस्थिती होती. नुतन पदाधिकारी यांचे पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

 

Protected Content