चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्‍यांवरील अन्यायाबाबत पठाण यांची तीव्र नाराजी

पाचोरा प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाने गट “क” आणि गट “ड” या दोन्ही श्रेणींमध्ये १०० टक्के रिक्त पदे मंजूर केली असताना, गट “क” श्रेणीतील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया आरोग्य सेवा आयुक्तालयातर्फे चालविली जात आहे. मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी ‘डी’ गटाच्या चौथ्या श्रेणीबाबत प्रशासनाच्या मौनावर नाराजी व्यक्त केली आहे.

गट “ड” वर्गातील कर्मचा-यांच्या मंजूर जागांपैकी सुमारे ८५ टक्के जागा रिक्त आहे. त्यामुळे १५ ते २० टक्के कर्मचा-यांवर कमालीचा ताण पडत आहे. हे कर्मचारी सर्वार्थाने खचून गेले आहेत. त्यांच्याकडे शासन अजिबात लक्ष देत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्‍यांमध्ये असंतोष असल्याचे भाऊसाहेब पठाण यांनी म्हटले आहे. आरोग्य विभागातील या जागा तत्काळ भरण्यात याव्यात, यासाठी त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव, आरोग्य आयुक्त तसेच आरोग्य सेवा संचालक, पुणे यांनाही लेखी निवेदन दिले आहे. 

“क” वर्गातील २७२५ जागा भरण्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, त्यांना झुकते माप देताना ड वर्गातील कर्मचा-यांबाबत कुठेही उल्लेख या जाहिरातीत नाही. दि. २१ मे २०२१ च्या पत्रान्वये शासनाने गट क व ड वर्गातील १०० टक्के जागा भरण्याची मान्यता दिली आहे. असे असतानाही शासनाकडून दुजाभाव केला जात असल्याचेही भाऊसाहेब पठाण यांनी म्हटले आहे.

 

Protected Content