वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । केंद्र सरकारने शेती संबंधी तीन नवीन कायदे मंजूर केल्याच्या निषेधार्थ आणि दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देवून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.

दिल्ली येथे देशातील शेतकरी केंद्र शासनाने पारित केलेले शेती संबंधित विधेयकाविरोधात आंदोलन करीत आहे. केंद्राने नवीन कायदा पास करतांना कोणतीही चर्चा न करता मंजूर केले आहेत. या विधेयकामुळे शेतकऱ्यांवर मोठ्याप्रमाणावर अन्याय झाला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकरी विरोधी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात दुरूस्ती करणारा अध्यादेश त्वरीत काढावा. हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या शेत मालाला हमी भाव मिळावा याची तरतूद करावी, रेल्वेचा खाजगीकरणाचा निर्णय केंद्र सरकारने त्वरीत रद्द करावा यासह आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, महिला प्रदेशाध्यक्षा शामिभा पाटील, प्रमोद इंगळे, जिल्हा महसचिव दिनेश इखारे, देवदत्त मकासरे, डिंगबर सोनवणे, विद्यासागर खरात, प्रकाश सोनवणे, जितेंद्र केदार, गिरीष नेहते, सचिन वानखेडे, राहूल सपकाळे, वंदना सोनवणे , फिरोज शेख, भिमराव सोनवणे, संगिता मोरे, पंचशिला आराक, ॲड, विनोद इंगळे, संगिता भामरे, वनिता इंगळे, जयश्री ननवरे, नाजीमाबी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/936818536726183

Protected Content