माझी वसुंधरा अभियानात एरंडोल नगरपरिषद जिल्ह्यातून दुसऱ्या क्रमांकावर

एरंडोल प्रतिनिधी । माझी वसुंधरा अभियानाचा प्रथम टप्प्यात एरंडोल नगरपरिषदेने जिल्ह्यात दूसरा क्रमांक पटकावला असून आता सन 2021-22 मधील द्वितीय टप्प्याचे कामकाज सुरू करण्यात आलेले आहे. 

या अभियान अंतर्गत पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन कामी वैयक्तिक व सामूहिकरीत्या हरित शपथ घेण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. दि.15 ऑगस्ट 2021 रोजी भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सर्व शासकीय व खाजगी कार्यालये, शाळा कॉलेज येथे होणा-या ध्वजारोहणाचे कार्यक्रमानंतर सामूहिकरीत्या हरित शपथ घेण्याचे आवाहन नगरपालिकेद्वारे करण्यात आले होते. त्यानुसार नगरपरिषद कार्यालय, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, एस. टी. महामंडळ, पंचायत समिती, वन विभाग, न्यायालय, पोलीस स्टेशन, सार्वजनिक  बांधकाम विभाग इ. शासकीय कार्यालये तसेच डी.डी.एस.पी. कॉलेज, फार्मसी कॉलेज, आर.टी काबरा हायस्कूल, मराठी मुलांची व मुलींची शाळा, बचपन स्कूल, महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल, पदमालय उच्च प्राथमिक शाळा, जि. प. उर्दू शाळा, जिजामाता हायस्कूल, बालशिवाजी शाळा, नॅशनल हायस्कूल, अॅग्लो ऊर्दू शाळा, उन्नती शाळा इ. याव्यतिरिक्त इतर खाजगी कार्यालये विविध कार्यकारी सोसायटी, ठेंगा सोसायटी, ग.स. सोसायटी, इ. ठिकाणी हरित शपथ घेण्यात आहे. त्यांची नोंद अभियानाचे पोर्टलवर करून त्यांना माझी वसुंधरा मित्र परिवारात सहभागी करण्यात आले असून प्रमाणपत्र देवून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. तसेच हरित शपथ घेवून या अभियानात सहभागी झालेल्या सर्वांचे मुख्याधिकारी श्री. विकास नवाळे व लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री रमेशसिंग परदेसी यांनी आभार मानले असून सर्वांनी हरीत एरंडोल करूया असे आवाहन केले आहे.

 

 

Protected Content