यावल नगरपरिषदेतर्फे दंड आकारणीसह दुकान सिलची कारवाई

यावल,  प्रतिनिधी  । कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर लावण्यात आलेल्या लॉक डाऊनच्या कडक निर्बंधांची अमलबजावणी न करणाऱ्या शहरातील काही व्यावसायिक आणि अनावश्यक विनाकारण फिरणाऱ्या रिकामटेकड्यांवर आज चौथ्या दिवशी ही यावल  नगर परिषदच्या वतीने दंडात्मक कारवाईची धडक मोहीम सुरू होती.

या संदर्भात यावल नगर परिषदच्या सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की, जळगाव जिल्ह्यात प्रशासनाकडुन कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लावण्यात आलेल्या संचारबंदीच्या कडक निर्बंधांची अंमलबजावणी  करीत असतांना आज दि. २१ मे रोजी यावल शहरातील मुख्य बाजार पेठेतील जिल्हाधिकारी आदेश झुगारून बाहेरून शर्टर बंद करून आतुन छुप्या पद्धतीने व्यवसाय करणारे गुरूनानक क्लॉर्थ स्टोअर्स, अनिल किराणा दुकान यांच्यासह शहरातील प्रसिद्ध दगडुशेठ सोनार ज्वेर्लस या दुकानांवर प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे अशी १५  हजार रुपये अशी दंडात्मक कारवाई करण्यात आली.  रमण सलुन, सुदर्शन चित्र मंदीर परिसर या दुकानास सिल करण्यात आले आहे . आज झालेल्या कारवाईत नगर परिषदचे प्रशासकीय अधिकारी विजय बडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरिक्षक शिवानंद कानडे, कनिष्ठ अभियंता  योगेश मदने, नगर परिषदचे कर्मचारी संदीप पारधे, नितिन पारधे, रवि काटकर, स्वप्नील म्हस्के, रामदास घारू, विश्वनाथ गजरे यांनी कारवाई केली.  सहाय्यक पोलीस निरिक्षक अजमल पठान , पोलीस अमलदार सलीम शेख, पोलीस अमलदार निलेश वाघ, गनी मिर्झा, जगन पाटील, ज्ञानेश्वर कोळी यांनी विशेष सहकार्य मिळाले. नगर परिषदच्या वतीने पोलीस प्रशासनाच्या विशेष सहकार्याने सुरू केलेल्या कारवाईच्या धडक मोहीमेत चार दिवसात एक लाखाच्यावर दंडात्मक कारवाईतुन महसूल गोळा करण्यात आला आहे. या दंडात्मक कारवाईचा  विनाकारण फिरणाऱ्यांवर प्रशासनाचा चांगलाच वचक बसल्याचे दिसुन येत आहे. दुसरीकडे मात्र प्रशासनाकडुन लागु करण्यात आलेल्या नियमाच्या आधारावर आपल्या कुटुंबासमवेत दुचाकी वाहनावर जाणाऱ्या महीलांना नियमांचे उल्लंघनाच्या नावांखाली त्रास दिला जात असल्याच्या विविध  पक्षाकडुन तक्रारी होत आहेत.  नगर परिषद  आणि पोलीस प्रशासन यांनी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या कोविड१९च्या नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

 

Protected Content