मुक्ताईनगरात परिवर्तन चौकात प्रहार जनशक्ति पक्षातर्फे ताली-थाली बजाव आंदोलन (व्हिडीओ)

मुक्ताईनगर प्रतिनिधी । केंद्र सरकारने तुर, मुंग आणि उडीद कड धान्याची आयात बंद करून किंमती कमी करण्यासाठी शहरातील परिवर्तन चौकात प्रहार जनशक्ति पक्षातर्फे ताली-थाली बजाव आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षकांना देण्यात आले.

प्रहार जनशक्तिचे युवा तालुकाध्यक्ष अनिल कान्हे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यंदाचा खरिप हंगाम जवळ आला असुन पेरणीपुर्व शेती मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे. परंतु पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते यांच्यासाठी लागणार्‍या आर्थिक बाबींची जुडवणुक करण्यासाठी शेतकरी बांधव लागला आहे. परंतु केंद्र शासनाने रासायनिक खतांवरील सबसिडी कमी केल्या मुळे खत उत्पादक कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किंमतीत मोठी भाववाढ केली आहे. यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक कंबरडे मोडणार आहे.

शेतकर्‍यांच्या या समस्येची दखल करून खतांच्या वाढीव किंमती कमी करण्यात याव्या व येत्या खरिप हंगामासाठी शेतकर्‍यांना उच्च उगवण क्षमता असणारे बियाणे रास्त भावात उपलब्ध करून देण्यात यावे व तुर उडीद डाळ यांची आयात बंद करून किमती कमी कराव्या अशी मागणी केली आहे. यंदाचा खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकरी बियाणे आणि खते खरेदीसाठी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यातच रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली असल्या कारणाने शेतकर्‍यांचे या खरीप हंगामाचे संपूर्ण आर्थिक नियोजन कोलमडून जाण्याची शक्यता आहे.      दरम्यान केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून. केंद्र सरकारच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ताली थाली बजाव आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात यांनी घेतला सहभाग 

प्रहार सेवक डॉ विवेक सोनवणे, युवा तालुकाध्यक्ष अनिल कान्हे, योगेश सोनवणे, इश्वर कोळी, सचिन लोखंडे, बबलू काळे यांच्यासह आदींनी आंदोलनात सहभाग नोंदविला.

https://www.facebook.com/508992935887325/videos/175662497806234

Protected Content