सर्वेक्षण, स्क्रिनिंगला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव शहर आणि जिल्ह्यातही कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जळगाव शहर महापालिका व केशवस्मृती सेवासंस्था समूहातील विविध प्रकल्पातील सहकाऱ्यांच्या सहयोगाने जळगावातील प्रभाग क्र. ६ व ७ मध्ये प्रत्येक घरात जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. त्यात घरोघरी प्रत्येकाची माहिती घेत त्यांचे तापमान, पल्स मोजणे तसेच आर्सेनिक अल्बम -30 होमिओपॅथिक औषधाचे वितरणही केले जात आहे.

केशवस्मृती सेवासंस्था समूहातील २२ प्रकल्पातील ६० सहकारी प्रत्यक्ष मैदानात उतरले. त्यांनी शुक्रवारी तुकाराम वाडी, जानकी नगर, पंचमुखी हनुमान परिसर, गिरणा कॉलनी परिसर, प्रोफेसर कॉलनी भागात घरोघरी जाऊन नागरिकांची संपूर्ण माहिती घेतली. तसेच त्यांच्या शरीराचे तापमान, पल्स मोजणी करीत त्यांच्या आजाराबद्दलही माहिती घेतली.त्यासोबतच त्यांना प्रतिबंधात्मक औषध म्हणून आर्सेनिक अल्बम – 30 या होमिओपॅथिक औषधीचेही वितरण करण्यात आले.

अभाविपचाही सहभाग
या सर्वेक्षणात अखिल भारतीय विधार्थी परिषदेचे १२ कार्यकर्ते प्रदेश सहमंत्री सिद्धेश्वर लटपटे यांच्या नेतृत्वाखाली तुकाराम वाडी परिसरात पीपीई कीट घालुन प्रत्यक्ष सर्वेक्षण करत आहे.

Protected Content