चिंताजनक : गेल्या ४८ तासात २२२ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना लागण !

 

मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या ४८ तासात २२२ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३ जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधित पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या आता ५,९३५ वर पोहचली आहे.

 

 

एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यानुसार गेल्या ४८ तासात २२२ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधित पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या आता ५,९३५ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत ७४ पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. याशिवाय ४,७१५ पोलिसांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. पोलीस दलातील कोरोना योद्ध्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Protected Content