कुसुंबाा येथे गावठी दारू विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा येथे बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या दोन जणांवर शनीवार २६ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलीसांनी कारवाई करत दीड हजार रूपयांची मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एमआयडीसी पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील कुसुंबा गावातील बसस्थानककडून हॉटेल वैदिका जवळ दोन जण बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारूची विक्री करत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार पोहेकॉ गफ्फार तडवी, सिध्देश्वर डपकर यांनी सकाळी १० वाजता धडक कारवाई करत संशयित आरोपी संतोष सुभाष कोळी (वय-२५) आणि सुनिल भास्कर कोळी (वय-२५) रा. कुसुंबा ता. जि.जळगाव यांच्यावर कारवाई करत त्यांच्याजवळून दीड हजार रूपये किंमतीची ३५ लिटर गावठी हातभट्टीची दारू हस्तगत केली आहे. दोघांवर पो.कॉ. सिध्देश्वर डापकर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content