पिलखेडा येथे जुन्या भांडणाच्या वादातून तरूणाला चौघांकडून मारहाण

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पिलखेडा येथील तरूणासह त्याच्या वडीलांना जुन्या भांडणाच्या वादातून बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना ७ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. 

पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पिलखेडा येथे चार ते पाच महिन्यांपुर्वी वाळूचे ट्रक्टर प्रशासनाने गावातील पंकज सुभाष चौधरी (वय-३९) याच्या सांगण्यावरून पकडले असा संशय घेवून सुरेश ठेमा साळुंखे, गुलाब ठेमा साळुंखे, सुनिता सुरेश साळुंखे आणि आशाबाई भरत साळुंखे सर्व रा. पिलखेडा ता.जि.जळगाव यांनी ७ एप्रिल रोजी पंकज चौधरीच्या घरात येवून शिवीगाळ केली व पंकजचे वडील सुभाष चौधरी यांना चापटा बुक्क्यांनी बेदम मरहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बुधवार ७ एप्रिल रोजी रात्री उशीरा तालुका पोलीस ठाण्यात पंकज चौधरी यांच्या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किरण आगोणे करीत आहे. 

 

Protected Content