चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

जळगाव प्रतिनिधी ।  भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकीने समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार तरूण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी अद्याप पोलीसात नोंद करण्यात आलेली नाही.

अधिक माहिती अशी की,  योगेश सुरेश पवार (२७, रा.डोमगाव, ता.जळगाव) हा तरुण जैन व्हॅली या कंपनीत कामाला आहे. बुधवारी ७ एप्रिल रोजी ड्युटी संपल्यानंतर तो दुचाकीने (क्र.एम.एच.१९ डी.पी.५२७२) घरी परत येत असताना वावडदा वडली दरम्यान भाऊसाहेब देसले यांच्या रसवंतीजवळील वळणावर वडलीकडून आलेल्या चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात योगेश याच्या डोक्याला मार लागला असून हात फ्रॅक्चर झाला आहे. दुचाकीच्या पुढच्या चाकाचे दोन तुकडे झाले आहेत. डोक्यात घातलेल्या हेल्मेटमुळे योगेशचे प्राण वाचले आहेत. या हेल्मेटचेही तुकडे झालेले आहेत. अपघात झाल्याचे लक्षात येताच अरुण पाटील, संतोष नेटके, रमेश पाटील व इतरांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला तातडीने खासगी वाहनातून जळगाव येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेबाबत अद्याप पोलीसात नोंद घेण्यात आलेली नाही.

Protected Content