पहूर-शेंदूर्णी मार्गावर पिकअपची मोटारसायकलला धडक : एक ठार

b00ebdde f490 4a23 b018 173f77f50d34

पहूर, ता.जामनेर, प्रतिनिधी | पहूर-शेंदूर्णी मार्गावर घोडेस्वारबाबा दरगाहजवळ मोटारसायकल व पिक अप यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज (दि.८) दुपारी १२.०० च्या सुमारास घडली.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महादेव बांबरुड, तालुका पाचोरा येथील अनिल चत्तरसिंग गजरे(भोई) (वय ४५) हे पहूरजवळील शेरी धरणातील मासे आपल्या गावी घेऊन जात असतांना घोडेस्वारबाबा दरगाहजवळ वळण रस्त्यावर समोरून येणाऱ्या पिकअप बोलेरो गाडीने (एमएच. ४३ ऐडी ८२५५) त्यांच्या मोटारसायकलला(एम.एच. १९ ए. एम. २४५६) जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच पहूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक किरण बर्गे, सहाय्यक फौजदार अनिल अहिरे, जितेंद्र परदेशी, अनिल राठोड, ईश्वर देशमुख यांनी घटनास्थळी येऊन मयतास पहूर ग्रामीण रूग्णालयात हलविले. मयत अनील गजरे यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, असा परिवार आहे. पहूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Protected Content