जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न (व्हिडीओ)

जळगांव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगावातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी ‘प्रत्येकाने वाचन केले पाहिजे, प्रत्येकाचे वाचन असेल तर कोणत्याही गोष्टीवर प्रभुत्व मिळविता येते’, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी केले. महाबळ कॉलनी येथे ग्रंथालयाच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा आज शनिवार,दिनांक २६ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांच्याहस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी कोनशिलेचे अनावरण करून तर पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांनी फीत कापून कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पालकमंत्री यांनी इमारतेची पाहणी केली. मंत्री ना. उदय सामंत यांनी यावेळी संवाद साधला. ”या इमारतीने जळगावच्या सौदर्यात भर पडणार असल्याचे सांगत २०१२/१३ साली आपल्याकडे १४ हजार ७०० ग्रंथालय होती. सर्वे केल्यानंतर त्यातली १२ हजार ३७६ ग्रंथालय चालू असल्याचं आढळलं. बाकींच्या ग्रंथालयाचं काय झालं ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्या अडीच हजार ग्रंथालयाची पुनरावृत्ती होणार नाही ही जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन केले.

पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील या प्रसंगी म्हणाले की, “ही इमारत डीपीडीसीच्या फंडातून उभी राहिली. पाच करोड रुपये आपण डीपीडीसीच्या फंडातून या इमारतीसाठी दिले. या वर्षीसुद्धा डीपीडीसीच्या माध्यमातून सोलर सिस्टिमसाठी ३१ लाख रुपये देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. वाचनामुळे माणसाच्या संस्कारांमध्ये, सर्व गोष्टींमध्ये बदल होत असतो. असे म्हणंत ग्रंथालय निर्मिती गरजेची असल्याचे प्रतिपादन पालक मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केलं.

याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार शिरीष चौधरी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, महापौर जयश्री महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले, अधीक्षक अभियंता सां.बा.मं.जळगाव रूपा राऊळ गिरासे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे यांच्यासह ग्रंथालयाचे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थिती होती.

व्हिडीओ लिंक १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/269758758610062

व्हिडीओ लिंक २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/973195116635569

Protected Content