इंडियन युमोनॉलॉजिकल्स तर्फे विस्तार पर्यवेक्षक प्रशिक्षणाचा कार्यक्रम

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघ व इंडियन इमोनॉलॉजिकल लिमिटेड सबसिडी ऑफ एनडीडीबी यांच्या संयुक्त विद्यमाने विस्तार पर्यवेक्षक व इन्चार्ज यांचे प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले.

जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या सुविधा भवनात घेण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्येक्रमात संतुलीत पशु आहार कार्यक्रम, जंत निर्मूलन, लसीकरण, खनिज मिश्रण व त्यांचे होणारे फायदे, विकास पशुखाद्य वापर व त्याचे फायदे, दुधाचे उत्पादन व गुणवत्ता वाढ करणे इ. सह दुग्ध व्यवसायावर आधारित विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा दूध उत्पादक संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये, प्रशासन विभाग प्रमुख डॉ.सी.एम.पाटील, संकलन विभाग व्यवस्थापक मनोहर देवरे, पशुखाद्य कारखान्याचे सहाय्यक व्यवस्थापक मंगेश पाटील, पशु उपचार व्यवस्थापक डाँ.एस.पी.पाटील, संकलन अधिकारी जयेश पाटील, जगदीश पाटील, indian immanologicals Limeted subsidiaey of (एन.डी.डी.बी.) चे उप व्यवस्थापक डेबोज्योती चट्टोपाध्याय,  इंडियन इमोनॉलॉजिकल लि. सब्बसीडरी (एन.डी.डी.बी.)चे सिनीअर आँफीसर निकितेश निर्मळ यावेळी कार्यकारी संचालक मनोज लिमये, डेबोज्योती चट्टोपाध्याय, निकितेश निर्मळ, डॉ.सी.एम.पाटील, डॉ.एस.पी.पाटील, जयेश पाटील, मनोहर देवरे व मंगेश पाटील यांनी विस्तार पर्यवेक्षक व उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Protected Content