चाळीसगावात जेसीआय सिटीतर्फे पत्रकारांचा सन्मान

चाळीसगाव, प्रतिनिधी | पत्रकार दिनानिमित्त जेसीआय सिटीच्या वतीने पत्रकार बांधवांचा येथील रंभाई आर्ट गॅलरीत प्रथमोपचार पेटी देऊन सन्मान करण्यात आला.

देशात दरवर्षी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात येतो. याच धर्तीवर चाळीसगावात जेसीआय सिटीच्या वतीने पत्रकार बांधवांचा रंभाई आर्ट गॅलरीत प्रथमोपचार पेटी देऊन सन्मान करण्यात आला. तत्पूर्वी अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करुन व दर्पणकार बाळशास्त्री जांबेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेसीआयचे तालुकाध्यक्ष धर्मराज खैरनार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून चाळीसगाव तालुका जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुजित वाघ, ज्येष्ठ पत्रकार सी. सी. वाणी , माजी नायब तहसिलदार देविदासजी खैरनार तर आयपीपी डॉ. प्रसन्न अहिरे, प्रकल्प प्रमुख मंगेश जोशी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांना देण्यात आलेल्या प्रथमोपचार पेटीविषयी माहिती डॉ. प्रसन्न अहिरे यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्तविक अध्यक्ष जेसीआयचे तालुकाध्यक्ष धर्मराज खैरनार यांनी केले. यावेळी पत्रकार रमेश चौधरी व मोतीलाल अहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केली. तर पत्रकारांच्या वतीने सी. सी. वाणी यांनी आभार मानले. प्रमुख अतिथी सुजित वाघ यांनी पत्रकारांना लागणार्‍या वैद्यकीय सेवेसाठी केव्हाही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सर्व पत्रकार बांधवांना अत्यावश्यक लागणारी वैद्यकीय प्रथमोपचार पेटी जेसीआय चाळीसगाव सिटीच्या माजी अध्यक्षांच्या हस्ते भेट देण्यात आली.

यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आर. डी. चौधरी, सचिव एम. बी. पाटील, संजय सोनार, रविंद्र अमृतकार, मोतीलाल अहिरे, जिजाबराव वाघ, सूर्यकांत कदम, देविदास पाटील, मनोहर कांडेकर, मुराद पटेल, अजिज खाटीक, श्रीकांत भामरे, अजय कोतकर, कुणाल कुमावत, रमेश चौधरी, विजय सपकाळे, निलेश परदेशी, योगेश मोरे, महेंद्र सुर्यवंशी, रणधीर जाधव, जीवन चव्हाण, आकाश धुमाळ, रोहित शिंदे, आनंद गांगुर्डे, योगेश्वर राठोड, यश पालवे, पराग सोनार, दिपक कच्छवा, अश्पाक पिंजारी, जाकिर मिर्झा, कैलास सुर्यवंशी, निळकंठ साबणे, मुख्तार खान, आदींना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय पवार, बालाप्रसाद राणा, प्रितेश कटारीया, गजानन मोरे, ऍड. शैलेंद्र पाटील, साहिल दाभाडे, जगदिशभाई पटेल, मनोज पाटील, वकार बेग, आतिश कदम, यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अफसर खाटीक यांनी तर आभार सचिव मयूर अमृतकार मानले.

Protected Content