मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी – मराठा समाजाच्या आशा पुन्हा पल्लवीत

मुंबई वृत्तसंस्था | सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला काही दिवसांपूर्वीच स्थगिती दिली होती मात्र त्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा सुप्रीम कोर्टात पोहोचला असून सर्वोच्च न्यायालयात विनोद पाटील यांनी दाखल केलेल्या मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी होणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कसोटीने प्रयत्न सुरू आहेत, मात्र सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकारसह मराठा समाजाच्या पदरी निराशा पडली होती, त्या आशा आता पुन्हा पल्लवीत झाल्या असून याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी या प्रकरणी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

“नवे प्रवर्ग निर्माण करण्याचा अधिकार राज्यांना नाही” असं सुप्रीम कोर्टाने निकालात म्हटलं होतं आणि आरक्षण रद्द केले होते. मात्र आता ‘केंद्राच्या नव्या कायद्यानंतर स्थिती बदलल्याने याचिका दाखल करण्यात आल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले आहे. आणि याच याचिकेवर दि. १२ जानेवारी रोजी ही सुनावणी होणार आहे, त्यामुळे यावेळी तरी मराठा समाजाला काही दिलासा मिळणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Protected Content