ऐतिहासिक बोरावल गेटचे सुशोभीकरण करा – शिवरत्न फाउंडेशनची मागणी

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | ऐतिहासिक वास्तु बोरावल गेटचे सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी शिवरत्न फाउंडेशन छत्रपती गृप यावलतर्फे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की. यावल  गावाला धार्मीक अध्यात्मीक, महर्षी मुनी, आणि ऐतिहासिक महत्व आहे. कै. कन्हैय्यालाल धोंडु मोरे यांनी दि. १ मार्च १९५६  मध्ये श्री. व्यासपुरी महात्म्य प्रसिध्द केले. त्यात यावलचे नाव फार पुर्वी व्यासनगरी असे नाव होते. पण त्याचे पुढे ब्यावल व नंतर यावल असे नामकरण झाले. महात्वाचे म्हणजे इ.स १७७० मध्ये जळगाव – धुळे जिल्हा कान्हदेश म्हणुन प्रसिध्द होता. कान्होजीच्या नावाने कान्हदेश प्रसिध्दीस आला. त्यानंतर निंबाळकर राजाधिश आले. ते दक्षिणेकडील पंचपुर्वीचे मराठे होते. ते मुख्य किल्ल्याचे किल्लेदार म्हणुन काम पहात असत. त्यांनीच भुईकोट किल्ला यावल येथे बांधला. त्याच वेळेस व्यासनगरीचे रक्षण चोर लुटारु यांच्यापासुन सरंक्षण करण्यासाठी तेव्हा संपुर्ण गावाला तटबंदी करुन वैभवाची साक्ष म्हणुन बोरावल गेट व दिल्ली गेट यांची निर्मीती केली. त्यात आजरोजी बोरावल गेटची अवस्था फार वाईट व दयनिय झालेली आहे. ते गेट यावल शहरात येणा-याचे स्वागत करते. तेव्हा आपण जर त्याचे सुशोभीकरण करुन यावल गावास व त्या वास्तुस पुन्हा वैभव प्राप्त करुन दयावे. त्यामुळे यावल गावाची शोभा वाढुन प्रत्येक यावलमध्ये अगमानार्थी आनंदी होईल.

निवेदनावर शिवरत्न फाउंडेशन अध्यक्ष किशोर माळी, उपाध्यक्ष नरेंद्र शिंदे, सचिव सागर लोहार, शहराज सिकंदर तडवी, विजय कोळी, अरुण सावकारे, कमलेश शिर्के, भरत भोई, आकाश दांडेकर, पियुष पाटील, राकेश शिर्के, दिनेश फेगडे, राहुल झाल्टे, संभाजी कोळी आदींची स्वाक्षरी आहे.

 

Protected Content