कॉमेडीला टिव्हीवरच राहू द्या : आदित्य ठाकरेंचा टोला

मुंबई- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अमृता फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरून कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार देतांना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कॉमेडीला टिव्हीवरच राहू द्या असा टोला लगावला आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्रॅफीक आणि घटस्फोटाचा जोडलेला बादरायण संबंध चर्चेचा विषय बनलेला आहे. या पार्श्‍वभूमिवर, मुंबईचे  पालकमंत्री आदित्य ठाकरे जोगेश्वरी पूर्व इथल्या पुनम नगर महापालिका शाळेच्या बास्केटबॉल कोर्ट चे उद्घाटन करण्यात आलं. आदित्य ठाकरे  यांनी यावेळी विविध मुद्यावर भाष्य केलं. मी शिवसैनिक म्हणून माझं कर्तव्य पार पाडत आहे. मुंबईचं मॉडेल आणि महाराष्ट्राचं मॉडेल इतर राज्यात पोहोचवणार आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहे. अमृता फडणवीस  यांच्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे यांनी कॉमेडीला टीव्हीवर राहूदेत, आपण राजकिय काम आणि उदीष्टाला महत्त्व द्यायचं, असं ते म्हणाले. हा एकप्रकारे आदित्य ठाकरे यांनी अमृता फडणवीस यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री आपले पहिल्या पाच मध्ये आलेले आहेत. मविआच्या कामाचं मॉंडेल इतर राज्यात पोहोचवणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

शिवसैनिकांना कुठल्या बास्केटमध्ये कुठला बॉल टाकायचा हे माहिती आहे. निवडणुकीला अद्याप वेळ आहे. चांगली काम होत असतात ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहोत. निवडणुकीच्या वेळेला विरोधकांना प्रचारात उत्तर देऊ, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

 

Protected Content