अजित पवार – उदयनराजेंची पुण्यात बंद दाराआड बैठक

पुणे, लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात आज बंदद्वार चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळातील वातावरणात चर्चेला उधाण आले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे दर शनिवारी ते पुण्यात कोरोना आढावा बैठक घेत असतात. आज त्यांनी कोरोना आढावा बैठक घेतली आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील काही महत्वाच्या निर्णयांबद्दल माहिती दिली.  दरम्यान, आज खासदार उदयनराजेंची अजित पवार आणि उदयनराजे यांच्यात आज पुण्यातील सर्कीट हाऊसमध्ये बंद्वार भेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

उदयनराजे भोसले यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सातार्‍यातील विकास कामांविषयी आपली अजित पवारांशी चर्चा झाल्याचं उदयनराजे भोसले यांनी सांगितलं. अजित पवारांसोबत विकास कामांबाबत चर्चा झाली. विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात अजित पवारांना विनंती केली, असं ते म्हणाले.

दरम्यान, यावेळी उदयनराजे भोसले यांना पत्रकारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील घरवापसीविषयी देखील विचारणा केली. पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाणार का? अशी विचारणा केली असता उदयनराजे भोसलेंनी उत्तर दिलं. शिवाजी महाराजांचं जसं सर्वधर्म समभाव हे धोरण होतं, तसंच माझंही धोरण सर्व पक्षीय समभाव असं आहे, असं उदयनराजे म्हणाले.

सध्या उदयनराजे भोसले भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सोडल्यानंतर त्यावरून बरीच चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा तशीच चर्चा सुरू झाली आहे ती उदयनराजे भोसले यांच्या घरवापसीची अर्थात ते पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

 

Protected Content