आपल्या क्लीप युट्युबवर टाकणार्‍यांची मुले. . . इंदुरीकर महाराजांचे पुन्हा आक्षेपार्ह बोल  

अकोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज | वादग्रस्त वक्तव्यांमुळे अलीकडेच वादात सापडलेले किर्तनकार इंदुरीकर महाराजांचे नवीन वक्तव्य पुन्हा एकदा वादग्रस्त ठरले असून यात त्यांनी आपल्या किर्तनाच्या क्लिप्स युट्युबवर अपलोड करणार्‍यांना लक्ष्य केले आहे.

आपल्या कीर्तनाच्या व्हिडीओ क्लिप बनवून यूट्यूबवर अपलोड करुन चार हजार लोक कोट्यधीश झालेत, त्यांच्यामुळेच आपण अडचणीत आलो असून अशांची मुलं दिव्यांग जन्माला येतील असं वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केलं आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी इंदुरीकर महाराजांचे कीर्तन आयोजीत केले असतांना त्यांनी हे वक्तव्य केले.

इंदुरीकर महाराज म्हणाले की, आपल्या कीर्तनाचे व्हिडीओ अपलोड करून आतापर्यंत चार हजार लोकांनी यू्ट्यूबवर कोट्यवधी रुपये कमावले आहेत. त्यांच्यामुळेच मी अडचणीत आलो आहे. आपल्या कीर्तनाच्या व्हिडीओ क्लिप्स यूट्यूबवर टाकणार्‍यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील.

आपल्या कीर्तनातून यूट्यूबवर व्हिडीओ अपलोड करणार्‍यांवर घसरणार्‍या इंदुरीकर महाराजांनी या आधीही अनेक वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. यातच आता या वक्तव्यावरून देखील त्यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे.

Protected Content