पोलिस अधीक्षकांच्या हस्ते पैलाड पोलीस चौकी नवनिर्माणाचे भूमिपूजन

अमळनेर,लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील पैलाड परिसरातील पोलिस चौकीचे नवनिर्माण मंगळग्रह सेवा संस्था करणार आहे. या कामाचे नुकतेच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

 

पोलीस चौकी नवनिर्माण प्रसंगी राज्यात सहसा कोठेही नसेल इतकी दिमाखदार व सुसज्ज अशी ही पोलिस चौकी बनविणार असल्याचे मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी सांगितले. त्याबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी डिगंबर महाले, संस्थेचे बांधकाम कन्सल्टंट संजय पाटील, कंत्राटदार साबीर शेख यांचा सत्कार केला. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पोलिस उपअधीक्षक राकेश जाधव, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजीनदार गिरीश कुलकर्णी, सेवेकरी विनोद कदम, आशीष चौधरी, चंद्रकांत वाघ, पैलाड परिसरातील ज्ञानेश्वर धनगर, नाना लांडगे, शालीक पहिलवान आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रसाद भंडारी व तुषार दीक्षित यांनी पौरोहित्य केले.

Protected Content