यावल नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष निवडीसाठी ऑनलाईन सभेचे आयोजन

यावल प्रतिनिधी । येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष निवडीसाठी शुक्रवारी (२४ सप्टेंबर) रोजी दुपारी १२ वाजता तहसीलदार महेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

यावल येथील नगर परिषदच्या तत्कालीन उपनगराध्यक्षा देवयानी महाजन यांनी त्यांचे पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ही निवड होत आहे. येथील नगर पारिषदचच्या उपनगराध्यक्ष पदासाठी २४ सप्टेंबर रोजी होत असलेल्या निवडीचा कार्यक्रम असा सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे ्‍यानंतर अर्जांची छाननी दुपारी १२, ३o ते १२ , ४५या अर्धा तासात अर्जाची माघार घेणे यानंतर आवश्यकता भासल्यास मतदान घेणे असल्याच्या सुचनांचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे पत्र प्राप्त झाले आहे. दरम्यान नगरपरिषदच्या उर्वरीत उपनगराध्यक्षपदाच्या कालावधी करीता नगरसेवक अभीमन्यू विश्वनाथ चौधरी ( हेन्द्री ) यांचे नाव निश्चीत मानले जात आहे.

Protected Content