Home धर्म-समाज रावेरमध्ये १७ ऑक्टोबरला श्री खाटू श्यामजींचा भव्य दरबार ; श्रुतिका राठोड व...

रावेरमध्ये १७ ऑक्टोबरला श्री खाटू श्यामजींचा भव्य दरबार ; श्रुतिका राठोड व कपिल नामदेव यांच्या भजनांची मेजवानी

0
7

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरात प्रथमच सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळातर्फे श्री खाटू श्यामजी यांचा भव्य दरबार व श्याम संकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेपासून हा धार्मिक सोहळा रंगणार असून, यानिमित्ताने भाविकांना श्री खाटू श्यामजी बाबांचे दर्शन आणि सुमधुर भजनांचा आनंद रावेर शहरातच घेता येणार आहे.

या कार्यक्रमासाठी राजस्थान येथील मोरवी नंदन सरकार यांचा भव्य श्याम दरबार सजविण्यात येणार असून, अखंड ज्योत प्रज्वलित केली जाणार आहे. मध्य प्रदेशातील प्रसिद्ध भजन गायिका सौ. श्रुतिकाजी राठोड आणि कपिलजी नामदेव हे आपल्या सुमधुर भजनांची प्रस्तुती करणार आहेत. हरदा येथील म्युझिकल ग्रुप या कार्यक्रमात संगीताची साथ देणार आहे.

भगवान श्रीकृष्णांचा वरदहस्त लाभलेले श्री खाटू श्यामजी यांच्याविषयी भाविकांमध्ये मोठी श्रद्धा आहे. कलियुगात बाबांच्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, रावेर व परिसरातील अनेक भाविक नियमितपणे राजस्थानमधील खाटू धाम येथे दर्शनासाठी जातात. मात्र, काही भाविकांना विविध कारणांमुळे तेथे जाणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळाने रावेरमध्येच बाबांचा दिव्य दरबार, अखंड ज्योत आणि श्याम संकीर्तनाचे आयोजन केले आहे. या धार्मिक सोहळ्याचा रावेर शहरासह परिसरातील जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. या कार्यक्रमामुळे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळाला गेल्या पाच दशकांची अखंड परंपरा लाभली आहे. मंडळाच्या दुर्गामातेच्या मूर्तीवर रावेरवासीयांची विशेष श्रद्धा असून, ही मूर्ती नवसाला पावणारी असल्याची भाविकांची भावना आहे. मंडळातर्फे दरवर्षी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विधिवत देवी स्थापना, सत्यनारायण महापूजा, यज्ञ आणि भव्य मिरवणूक हे उत्सवाचे प्रमुख आकर्षण असते. यंदाही मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, २१ ऑक्टोबर रोजी रावेर शहरातून भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष विशाल अग्रवाल, उपाध्यक्ष संदीप महाजन, सचिव अजिंक्य वाणी, खजिनदार विपुल अग्रवाल, सल्लागार रवींद्र पाटील, नगरसेवक नितीन महाजन, व्यापारी तुषार अग्रवाल तसेच सदस्य अक्षय मानकर, डीडी वाणी, अशोक गायकवाड, हर्षल महाजन, अर्पित अग्रवाल, मिलिंद महाजन आणि सोनू अग्रवाल परिश्रम घेत आहेत.


Protected Content

Play sound