दोन लाखासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । घर बांधण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपये आणावे आणि मुलगी झाली यासाठी विवाहितेचा छळ करून शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या पतीसह सहा जणांविरूध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, रूपाली शैलेंद्र गायकवाड रा. जिजाऊ नगर यांचा विवाह ७ मे २०१८ रोजी मध्यप्रदेशातील सेंधवा तालुक्यातील  तलावाडी येथील शैलेद्र कैलास गायवकाड यांच्याशी रितीरिवाजाप्रमाणे झाले. सुरूवातीचे सहा महिने विवाहितेचे चांगले गेले. त्यानंतर संसारवेलीवर मुलगी झाला. दरम्यान पती शैलेंद्र गायकवाड यांनी मुलगी झाली आणि घरबांधकामसाठी माहेरहून दोन लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. यासाठी सासरे कैलास मांगीला गायकवाड, वसुबाई कैलास गायकवाड, संगिता जितेंद्र जाधव, नरेंद्र कैलास गायकवाड, राजेंद्र कैलास गायकवाड सर्व रा. तलावडी, ता. सेंधवा जि. बडवानी (मध्यप्रदेश) यांनी पाठबळ दिले. या सर्व गोष्टींना विवाहिता कंटाळून जळगाव माहेरी निघून आल्या. १२ जून रोजी दुपारी ३ वाजता विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह सहा जणांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिनेश पाटील करीत आहे. 

Protected Content