अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर ताब्यात

यावल प्रतिनिधी । येथील महसूल प्रशासनाने विना परवाना अवैध वाळू वाहतूक करणार्‍या दोन ट्रॅक्टरना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान यावल तालुक्यातील भालशिव येथील तुषार आंबादास कोळी यांच्या मालकीचे ट्रॅक्टर (क्रमांक एमएच १९ सिव्ही७०९३) वाहनचालक सुभाष ईश्वर सपकाळे यांच्या कडील ट्रॅक्टर बेकाद्याशीर वाळुची वाहतुक करताना तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तलाठी ईश्वर कोळी यांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

तर दुसऱ्या घटनेत किनगावचे मंडळ अधिकारी सचिन जगताप यांच्यासह तलाठी किनगाव कोतवाल यांनी आडगाव फाटा परिसरात ट्रॅक्टर (क्रमांक एमएच १९ सिव्ही७०६७) या नारायण प्रल्हाद पाटील (रा.आडगाव) यांच्या मालकीच्या वाहनाने चालक भाऊसाहेब प्रकाश पाटील हे ट्रॅक्टर व्दारे वाळुची करतांना पकडण्यात आले असुन, या दोघ ट्रॅक्टर महसुल प्रशासनाने ताब्यात घेतले आहेत. त्यांच्यावर प्रत्येकी १ लाख३० हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई होणार असल्याचे महसुल प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

 

Protected Content