भाजप सोडण्याचा विचारही नाही : रक्षा खडसे

जामनेर प्रतिनिधी । नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर माझ्याबाबतही वावड्या उठत असल्या तरी आपण कालही भाजपमध्ये होतो, आजही असून उद्या देखील राहणार असल्याचे प्रतिपादन खासदार रक्षा खडसे यांनी केले. त्या येथील कार्यकर्ता शिबिरात बोलत होत्या.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

वाकोद येथे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर झाले. याच्या समारोप कार्यक्रमात खासदार रक्षा खडसे (MP Raksha Khadse) यांची उपस्थिती होती. याप्रसंगी त्या म्हणाल्या की, अनेकांना प्रश्‍न असतो की, नाथाभाऊंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला तर पुढे मी ही त्या पक्षात जाईल. परंतु मी कालही भाजपत होती, आजही आहे आणि पुढेही भाजपमध्येच राहिल. अनेकांना मुक्ताईनगरात प्रशिक्षण शिबिर होते की नाही ? याबाबत उत्सुकता लागून होती. तथापि, मुक्ताईनगरात प्रशिक्षण शिबिर झाले असून याला दीडशेपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती असल्याची माहिती त्यांनी दिली.

कार्यकर्त्याने पक्षाने दिलेली जबाबदारी इमानदारीने पार पाडली पाहिजे. कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच पक्षाचे संघटन मोठ्या प्रमाणात वाढते. आयुष्यात प्रत्येक गोष्ट सहज मिळत नसते, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असेही खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले.

याप्रसंगी नगराध्यक्षा साधना महाजन, माजी आमदार स्मिता वाघ, अ‍ॅड. शिवाजी सोनार, गोविंद अग्रवाल, दिलीप खोडपे, चंद्रकांत बाविस्कर, अमित देशमुख, अतिष झाल्टे उपस्थित होते. सूत्रसंचालन रवींद्र झाल्टे तर आभार रामेश्‍वर पाटील यांनी मानले.

Protected Content