वरणगावात भाजपच्या अभ्यास वर्गास प्रारंभ

वरणगाव, ता. भुसावळ प्रतिनिधी । येथील नागेश्‍वर मंदिर परिसरात भारतीय जनता पक्षाच्या अभ्यास वर्गास प्रारंभ झाला असून यात पहिल्या दिवशी जिल्हाध्यक्ष, खासदार व आमदारांसह मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

शहरात भुसावळ शहर व तालुका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता अभ्यास वर्गाला शनिवारी नागेश्‍वर महादेव मंदिर परिसरात सुरुवात झाली. यात जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, जि.प. माजी शिक्षण सभापती पोपट भोळे, पं.स. सभापती मनिषा पाटील, सदस्य प्रिती पाटील, वंदना उन्हाळे, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, डॉ.अतुल सरोदे उपस्थित होते. भुसावळ तालुक्यासह वरणगाव व भुसावळ शहरातील नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शनिवार आमदार राजूमामा भोळे यांनी मार्गदर्शन केले. तर आरंभी जिल्हाध्यक्ष आ.भोळे यांनी मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात माजी जि.प. अध्यक्ष अशोक कांडेलकर, माजी आमदार स्मिता वाघ यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, रविवारी आमदार संजय सावकारे, डॉ.राधेश्याम चौधरी, माजी सभापती पोपट भोळे, जयंती सुराणा, उदय भालेराव, अजय भोळे, प्रशांत देवरे मार्गदर्शन करणार आहेत.

Protected Content