राष्ट्रीय महामार्गावर अपघात; सावदा येथील दोघे ठार

जळगाव प्रतिनिधी | अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाजवळ सावदा येथील दोन मोटारसायकलस्वारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे.

याबाबत वृत्त असे की, राजेंद्र भादू डोळे ( वय ४२; पाटीलपुरा सावदा, ता. रावेर) व शेख महेमूद शेख रज्जाक (वय५३ रा सावदा) हे दोन्ही जण मोटारसायकलवरून जळगावकडे कामानिमित्त येत होते. दरम्यान, रेल्वे उड्डाण पुलाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत हे दोन्ही जण जागीच ठार झाले.

अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या संदर्भात नशिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Protected Content