Home क्राईम हर्बल लाईफच्या नावाखाली १.२३ कोटींचा महागंडा! फसवणुकीच्या मुख्य सूत्रधाराला बडनेरा रेल्वे स्थानकावरून...

हर्बल लाईफच्या नावाखाली १.२३ कोटींचा महागंडा! फसवणुकीच्या मुख्य सूत्रधाराला बडनेरा रेल्वे स्थानकावरून उचलले!

0
28

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । हर्बल लाईफ कंपनीत गुंतवणुकीचे मोठे आमिष दाखवून नागरिकांची १ कोटी २३ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक करून गेल्या वर्षभरापासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला जळगाव आर्थिक गुन्हे शाखेच्या शोध पथकाने बडनेरा रेल्वे स्थानकावर धावत्या ट्रेनमधून पकडून नाट्यमयरित्या जेरबंद केले आहे. दिपेश कमलेश रुपानी (रा. फ्लॅट नं. ७, तिसरा मजला, सुमन रेसिडेन्सी, गणपती नगर, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

रामानंद नगर पोलीस ठाण्यात दाखल गु.र.नं. ७७/२०२५ व ८८/२०२५ मधील आरोपी दिपेश रुपानी याने तक्रारदारांचा विश्वास संपादन करून हर्बल लाईफ कंपनीत गुंतवणुकीच्या नावाने तब्बल १,२३,८६,००० रुपयांना गंडा घातला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी राजस्थान (जोधपूर), अमरावती, नागपूर, खामगाव अशा विविध ठिकाणी ठिकाणे बदलून राहत होता. तो सतत मोबाईल क्रमांक आणि सिमकार्ड बदलत असे, तसेच पोलिसांना गुमराह करण्यासाठी त्याने अलिकडेच टक्कल करून स्वतःचा पेहरावही बदलला होता.

आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस उप अधीक्षक नितीन पाटील यांना तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी गोवा येथून CSMT ते नागपूर दुरंतो एक्स्प्रेसने प्रवास करत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावरून शोध पथक भुसावळ रेल्वे स्थानकावर पोहोचले, परंतु दुरंतोचा थांबा अवघ्या ५ मिनिटांचा असल्याने गाडी सुटली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ बडनेरा रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली. बडनेरा येथे ट्रेनचा वेग मंदावताच आरोपी दिपेश रुपानी याने धावत्या गाडीतून प्लॅटफॉर्मवर उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क असलेल्या पोलीस पथकाने धावत्या गाडीतून उतरून त्याचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सह. पोलीस उपनिरीक्षक विजय निकुंभ, पोहवा. प्रितमकुमार पाटील, समाधान पाटील, घनश्याम पवार व विजय शिरसाठ यांच्या पथकाने ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. अशा प्रकारे हर्बल लाईफ कंपनीच्या नावाने फसवणूक झालेल्या इतर नागरिकांनीही जळगाव आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हर्बल लाईफ कंपनीत १.२३ कोटींची फसवणूक करून फरार असलेल्या दिपेश रुपानी याला जळगाव आर्थिक गुन्हे शाखेने बडनेरा रेल्वे स्थानकावर नाट्यमय पाठलाग करून अटक केली आहे.


Protected Content

Play sound