शेतीच्या वादातून दाम्पत्याला मारहाण ; जीवे मारण्याची धमकी

 

चाळीसगाव : प्रतिनिधी । शेतीच्या वादातून शेतातच दाम्पत्याला प्रतिवादी गटाने मारहाण करीत  जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना वाघळी शिवारात घडली

 

फिर्यादी राजेंद्र पाटील ( रा – शास्त्रीनगर , चाळीसगाव ) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी ते त्यांच्या वाघळी शिवारातील   शेतात गेले होते . त्या शेतात त्यांना आरोपी हिरामण सूर्यवंशी ,  भिवसन  सूर्यवंशी , काशिनाथ सूर्यवंशी , पांडुरंग सूर्यवंशी , दिनकर सूर्यवंशी व अलकाबाई सूर्यवंशी  ( रा – वडाळा वडाळी , ता – चाळीसगाव )  या ६ आरोपींनी याच शेताच्या वादातून लोखंडी गज आणि लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले . याच शेताच्या वादात मनाई हुकुमाचा निकाल फिर्यादी राजेंद्र पाटील यांच्या बाजूने लागलेला असला तरी चिडून या आरोपींनी आपल्याला मारहाण केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे सगळे आरोपी बांधावर राजेंद्र पाटील यांना मारहाण करत असताना त्यांच्या पत्नी हेमलता पाटील मोबाईलने या मारहाणीचे चित्रीकरण करत  होत्या . ते लक्षात आल्यावर पांडुरंग सूर्यवंशी याने त्यांच्या  अंगचटीला  जाऊन त्यांचा मोबाईल आणि गळ्यातील २५ ग्राम वजनाची सोन्याची पोत  हिसकावून घेतली आणि हेमलता पाटील यांनीही बेदम मारहाण केली . अलकाबाई सूर्यवंशी हिने या दाम्पत्याला येथेच गाडून टाका अशी धमकी दिली

 

या सर्व आरोपींविरोधात चाळीसगाव ग्रामीण  पोलीस ठाण्यात गु र न ३१८ / २०२१ , भा द वि कलम १४३ , १४७ , १४८ , १४९ , ३२७ , ३२६ , ३२३ , ५०४ , ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पो कॉ संदीप माने पुढील तपस करीत आहेत

Protected Content