शिरसाळा येथील मारहाणीप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

बोदवड प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसाळा येथे राजेंद्र तायडे यांना मारहाण केल्या प्रकरणी अखेर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, शिरसाळा येथे दिनांक ९ तारखेला संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान शिरसाळा बस स्टँड वर सुरेश नारायण कोळी हे आपल्या मित्रांसोबत उभे असताना गावातील राजेंद्र गोविंद पाटील यांच्या धक्काबुक्की झाली. याप्रसंगी राजेंद्र देविदास तायडे याला काहीएक कारण नसताना राजेंद्र गोविंदा पाटील, जितेंद्र रामदास पाटील, रघुनाथ पांडुरंग पाटील, गणेश विश्‍वनाथ पाटील व अमोल एकनाथ पाटील या पाच जणांनी लाकडी दांडा व लोखंडी रॉडने जबर मारहाण केली होती. यामध्ये राजेंद्र देविदास तायडे गंभीर जखमी अवस्थेत जळगाव येथे खाजगी दवाखान्यात अ‍ॅडमिट केले होते. या गुन्ह्यातील आरोपी क्रमांक दोन रघुनाथ पांडुरंग पाटील यांच्याविरुद्ध यापूर्वी बोदवड पोलीस स्टेशन मध्ये चार ते पाच गुन्हे दाखल आहेत. यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अनुषंगाने संशयित आरोपी जितेंद्र रामदास पाटील. राजेंद्र गोविंदा पाटील. रघुनाथ पांडुरंग पाटील. गणेश विश्‍वनाथ पाटील. अमोल एकनाथ पाटील. यांच्याविरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या आदेशाने बोदवड पोलीस स्टेशनला भारतीय दंड विधान कलम ३२६. ३२३. १४३. १४७. १४८ .१४९. ५०४. व ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक श्री भाईदास मालचे करीत आहे. दरम्यान शेवटचे वृत्त हाती आले तोवर आरोपींना अद्याप अटक केली नसल्याचे समजते.

Protected Content