पैशांवरून महिलेला शिवीगाळ व जीवेठार मारण्याची धमकी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पैसे दिले नाही म्हणून महिलेला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शहरातील गोलाणी मार्केट परिसरात घडला आहे. याप्रकरणी एकावर शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशनबी मुबारक मण्यार (वय-३३) रा. मण्यारवाडा, नशिराबाद ता.जि.जळगाव ह्या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. या कामानिमित्त जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरात मंगळवारी ३१ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास आल्या होत्या. त्या ठिकाणी शिवा सुदाम पवार रा. गेंदालाल मिल जळगाव हा आला. त्याने महिलेकडे पैसे मागितले. महिलेने  पैसे दिले नाही याचा राग आल्याने शिवा पवार याने महिलेला शिवीगाळ केली. तसेच चाकूने मारून टाकेल आणि गांजाची पुडी टाकून तुम्हाला फसवेल असे धमकी दिली. महिलेने शहर पोलिस ठाण्यात सायंकाळी ७ वाजता धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात संशयित शिवा सुदाम पवार यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव शिरसागर करीत आहे.

Protected Content