अविरतपणे सेवा देणाऱ्या लालपरीचा अनोखा वाढदिवस साजरा

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला गेल्या 74 वर्षांपासून अविरत सेवा देणाऱ्या लालपरीचा अनोखा वाढदिवस जळगाव विभागात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी प्रास्ताविक करताना गोपाळ पाटील यांनी सांगितले की १ जून १९४८ रोजी नगर ते पुणे बेड फोर्ड कंपनीची बस धावली. या बसला पाहण्यासाठी खेड्यापाड्यातून गावकऱ्यांचे थवे रस्त्याच्या कडेला उभे होते. इंग्रज अधिकाऱ्यांच्या लहान गाड्या गावकऱ्यांनी पाहिल्या होत्या परंतु पहिल्यांदाच सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू झालेल्या बसेस पाहण्यासाठी अथांग सागर जमला होता.

याप्रसंगी दीप प्रज्वलन करून बसस्थानकावर उपस्थित प्रवाशांना पेढे वाटप करण्यात आली त्याचप्रमाणे बसस्थानकावरील वयोवृद्ध प्रवासी सूर्यकांत पवार (चांदसर), माधव गायकवाड (आळंदी), किसन पाटील (गाढोदे), बुधा राणे (अडावद), मीना पोद्दार (लातूर) यांच्या गुलाब पुष्प देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव विभागाचे यंत्र अभियंता श्रावण सोनवणे हे होते तर राहुल शिरसाट (कामगार अधिकारी) प्रशांत महाजन (विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी) सुरेश महाजन, पंकज महाजन (आगार व्यवस्थापक), मनोज तिवारी (स्थानक प्रमुख), नरेंद्र सिंग राजपूत, संदीप सूर्यवंशी, महेश शर्मा, यशवंत कुलकर्णी, आनंदा सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी यंत्र अभियंता श्रावण सोनवणे यांनी सांगितले की आजपर्यंत एसटी महामंडळाच्या गाड्यांनी आपली लोकप्रियता कायम ठेवली आहे. दरवर्षी 1 जून रोजी प्रत्येक आगारात एसटी महामंडळाचा वाढदिवस साजरा करण्यात येतो. फुलहारांनी सजलेल्या एसटी महामंडळाच्या लालपरीस कर्मचाऱ्यांकडून नमन केले जाते.

 

Protected Content