विवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी सासरच्या मंडळींविरूध्द गुन्हा

बोदवड प्रतिनिधी । तालुक्यातील सुरवाडे बुद्रुक येथे विवाहिता ट्रिन्कल हेमंत मिस्तरी हीने आपल्या राहत्या घरात सासरच्या जाचास कंटाळून आपली जीवनयात्रा संपविले असून याबाबत सासरच्या मंडळींविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, २/१/२०१९ रोजी मयत विवाहिता ट्रिन्कल हिचा विवाह झाला होता. विवाह नंतरच्या दोन महिन्या नंतर मयत विवाहीतेला सासरच्या मंडळींकडून लग्नामध्ये आम्हाला मानपान मिळाला नाही या वरुन तिला सारखे टोचून बोलत छळ केला जात होता. तसेच तिचा पती व देर हे कामासाठी भुसावळ एम आय डी सी मध्ये त्यांना कामावरुन येजा करण्यासाठी मोटारसायकल घेण्यासाठी माहेरहून ५० हजार रूपये मागण्यात आले होते. तसेच शेजारील पोलिस पाटील पती संजय नामदेव राऊत याचे सासरच्या मंडळींचे घरोब्याचे संबंध असल्याने तिचा शारीरीक आणि मानसिक छळ केला जात होते. यामुळे त्या विवाहीतेने दिनांक १० रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास आपल्या सासरच्या राहत्या घरात सुरवाडे बुद्रुक येथे राहत्या घरात गँस शेगडी च्या साह्याने स्वतः हा पेटवून घेत आत्महत्या केली. या प्रकरणी मयत विवाहीतेची आई सुवर्णा विजय दांडगे वय ३८ यांच्या फीर्यादी वरुन आरोपी पती हेमंत गोपाल मिस्तरी,सासरे गोपाल शंकर मिस्तरी, सासू तुळसाबाई गोपाल मिस्तरी, दीर विजय उर्फ उमेश गोपाल मिस्तरी, संजय नामदेव राऊत सर्व राहणार सुरवाडे बुद्रुक यांच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास उपपोलिस निरीक्षक भाईदास मालचे करित आहेत.

Protected Content