धक्कादायक : भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठकची आत्महत्या !

वसई (वृत्तसंस्था) भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठक हिने आपल्या काशिमिरा येथील राहत्या घरी पंख्याला लटकून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने २ ऑगस्ट रोजी फेसबुक लाईव्ह केले होते. त्यावेळी तिने चाहत्यांशी संवाद साधला होत. दरम्यान, घरात अनुपमाची सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये तिने आत्महत्येची दोन कारणे सांगितली आहेत.

 

अनुपमा भोजपूरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होती. आत्महत्या करण्यापूर्वी २ ऑगस्टच्या  रात्री १२  वाजेच्या सुमारास तिने फेसबुक लाईव्ह केले होते. तिने आपल्या फॅन्ससोबत संवादही साधला होता. या फेसबुक लाईव्हमध्ये अनुपमाने कुणावर विश्वास ठेवू नका, असे सांगितले होते. दरम्यान, अनुपमाने मालाडच्या विस्डम प्रोड्युसर कंपनीमध्ये दहा हजार रुपये गुंतवले आहेत. ती कंपनी पैसे देण्यास टाळाटाळ करत होती. तसेच मनीष झा नामक पत्रकाराने गावी जाण्यास अनुपमाकडून स्कूटर घेतली होती. मात्र, ती स्कूटर झा परत देत नव्हता,असाही आरोप केला होता. त्यांनतर पोलिसांनी भादवि कलम ३०६ अन्वये मनीष झा आणि विस्डम कंपनीचे प्रोड्युसर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Protected Content