जळगावात डीमार्ट पार्कींगमधून दुचाकी लंपास

bike chori 201895 102842 05 09 2018

जळगाव प्रतिनिधी । डीमार्टमध्ये खरेदी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याची दुचाकी पार्कींगमधून अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना आज उघडकीस आली असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील गोविंद एकनाथ वाणी हे त्यांची मुलगी निकिता मालपूरे हे वस्तू खरेदी करण्यासाठी आज दुपारी १२ वाजेच्यासुमारास दुचाकी (क्रमांक एम.एच. 1 ए.टी. 0922 ने शहरात आले. डिमार्ट मध्ये खरेदी करावयाची असल्याने येथील पार्कींगमध्ये दुचाकी लावून वस्तू खरेदी करण्यासाठी गेले. खरेदी करुन आल्यानंतर पार्किंगमध्ये दुचाकी आढळून आली नाही. परिसरात सर्वत्र शोध घेतला असता दुचाकी मिळून आली नाही. दुचाकी चोरीची खात्री झाल्यानंतर वाणी यांनी रामादंनगर पोलिसात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक उमेश साळुंखे हे करीत आहेत.

Protected Content