समतानगर मारहाण प्रकरणात सहा जण ताब्यात

Crime 1

जळगाव प्रतिनिधी । पैश्यांच्या वादातून तरूणाला सात ते आठ जणांनी बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना ४ फेब्रुवारी घडली होती. याप्रकरणात महिलेसह दोन तरूणांना ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी रात्री याघटनेच्या तपासाकामी अजून सहा जणांना रामानंद नगर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

अधिक माहिती अशी की, संदीप पुंडलिक नन्नवरे हा तरूण कुटुंबासह समतानगर बौध्दवाडा येथे वास्तव्यास आहे. संदीप याची आई कलाबादर्स नन्नवरे यांनी कलाबाई अहिरे यांच्याकडून पाच हजार रूपये घेतले होते. नंतर त्यांनी ही रक्कम परतही केली. परंतु व्याजासकट पैसे देण्याचा आग्रह त्यांच्याकडे धरण्यात आला होता. या कारणावरून जिगर अहिरेसह त्याच्या इतर साथीदारांनी संदीप याच्या घरावर हल्ला चढवित त्याला गंभीररित्या जखमी केले होते. या प्रकरणी दाखल गुन्हयात रामानदनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री अक्षय लक्ष्मण अहिरे उर्फ जिगर (25), विक्की उर्फ धिरज अरूण शिंदे (20) ,सागर लक्ष्मण अहिरे (26) , कैलास राजाराम शिंदे(53), प्रसाद मधुकर महाजन (21),राहुल शशीकुमार सुरवाडे (33) सर्व रा.समतानगर यांना शुक्रवारी रात्री नऊ वाजता ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड, अतुल पवार, प्रदीप चौधरी, सतिष डोलारे यांनी ही कारवाई केली. दरम्यान जखमी संदीप याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Protected Content