दुचाकीवरील ताबा सुटल्याने अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव दुचाकीवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, विजय जनार्दन पाटील (वय-४९) रा. के.पी.क्लब, दत्त मंदीराजवळ भुसावळ हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ५ एप्रिल रोजी मध्यरात्री १२. ३० ते १ वाजेच्या सुमारास विजय पाटील हे त्यांची दुचाकी (एमएच १९ एसी १९२२) ने फैजपूर येथील पिंपरूळ रोडवर टिव्हीएस शो रूम जवळ दुचाकीने जात होते. अचानक त्यांचा भरधाव दुचाकीवरील ताबा सुटल्याने रोडच्या बाजूला असलेल्या चारीतील झुडूपात दुचाकी घुसली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्या उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे. याघटनेप्रकरणी स्वत:च्या मरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पेाहेकॉ रविंद्र मोरे करीत आहे.

 

Protected Content