बहिणाबाई कोवीड केअर सेंटरला दानशुर व्यक्तींची किराणा साहित्याची मदत

जळगाव प्रतिनिधी । लोक संघर्ष मोर्चा व लेवा पाटीदार सोशल ॲण्‍ड स्पोर्टस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामानाने शासकीय तंत्रनिकेतन येथील बहिणाबाई कोवीड केअर सेटरला डॉ. क्षितीज भालेराव यांनी किराणा साहित्य देवून मदत केली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी कोवीड केअर सेंटरला सदिच्छा भेट दिली.

लोक संघर्ष मोर्चा व लेवा पाटीदार सोशल ॲण्‍ड स्पोर्टस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामानाने शासकीय तंत्रनिकेतन येथील बहिणाबाई कोवीड केअर सेंटर ५ सप्टेंबर पासून सुरू करण्यात आले. आज कोविड केअर सेंटरला पोलीस अधीक्षक  डॉ. प्रवीण मुंडे यांनी सदिच्छा भेट दिली. डॉ. मुंडे हे स्वतः डॉक्टर असल्याने त्यांनी पेशंटला काय ट्रीटमेंट दिली जाते, कुठला प्रकारचा आहार दिला जातो. ह्या बद्दल संपूर्ण माहिती घेतली बहिणाबाईमध्ये असलेल्या सुविधा व रुग्णांची घेतली जाणारी काळजी ह्या बाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. समाजातील दाते जेव्हा अश्या कठीण प्रसंगात आपले दातृत्व देण्यासाठी पुढे येतात तेव्हा खऱ्या अर्थाने प्रशासनाची ताकद वाढते आणि म्हणून बहिणाबाई सेंटर हे समाजासाठी आदर्श नक्कीच ठरेल .त्यांच्या ह्या सदिच्छा भेटीचे बहिणाबाई सेंटरच्या सर्व  संचालक मंडळातील सदस्यांच्या वतीने डॉ.प्रवीण मुंडे चे लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. क्षितिज भालेराव यांनी तेल, तांदूळ व किराणा साहित्य बहिणाबाई सेंटरसाठी मदत दिली. आत्ता पर्यंत ह्या सेंटर मधून २८५ रुग्ण बरे होवून आपल्या आपल्या घरी सुखरूप परतलेत याचा आम्हाला अत्यंत अभिमान व आत्मिक समाधान असल्याचे सचिन धांडे व चंदन कोल्हे यांनी मत व्यक्त केले. याप्रसंगी ललित कोल्हे, महेश चौधरी, महेश चावला , प्रमोद पाटील हे उपस्थित होते.

Protected Content