पंचशील नगरातील नागरिकांना सुविधा द्या ; विनोद सोनवणे यांची मागणी

भुसावळ, प्रतिनिधी । येथील पंचशील नगरात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाने परिसराला सील केला आहे. हा परिसर सील झाल्याने येथील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लगत असून त्यांच्या समस्या सोडविण्यात याव्यात अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्यध्यक्ष विनोद सोनवणे यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात केली आहे.

पंचशील नगरात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने या परिसरातील नागरिकांना बाहेर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. नगरपरिषदेने परिसरातील नागरिकांसाठी कुठल्याही सुविधा दिल्या नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. महिला-पुरुषांना शैचालयासाठी व्यवस्था नसल्याने हाल होत आहे. तसेच परिसर सील झाल्यापासून सॅनिटायझर फवारणी, परिसरातील लोकांची वैद्यकीय तपासणी अद्याप झालेले नसल्याचा आरोप जिल्ह्यध्यक्ष श्री. सोनवणे यांनी निवेदनात केला आहे. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, प्रांत अधिकारी रामसिंग सुलाने, मुख्याधिकारी कल्पना डहाळे, बा.पो.स्टे.नि.दिलीप भागवत तसेच न.पा.चे डॉ. संदीप जैन उपस्थित होते. निवेदनावर भारिप बहुजन महासंघ जळगाव जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्यध्यक्ष विनोद सोनवणे, संजय सुरळकर जिल्ह्या सचिव,प्रमोद तायडे, किशोर वाघ,अल्लाबक्ष शहा यांच्या सह्या आहे. प्रांत अधिकारी रामसिंग सुलाने यांनी विनोद सोनवणे यांना त्यांच्या मागण्याची पूर्तता केली जाण्याची ग्वाही दिली.

Protected Content