जळगाव शहरात एक दिवस उशिराने पाणी पुरवठा

 

 

जळगाव, प्रतिनिधी । शहराला वाघुर योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येतो. येथील उच्च वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिनीत तांत्रिक बिघाड  झाल्याने शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला असल्याचे शहर अभियंता यांनी कळविले आहे.

वाघुर योजनेचा  उच्च वीज पुरवठा गुरुवार १८ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास उच्च दाब वीज वाहिनीवर तांत्रिक बिघाड झाला आहे. अद्यापही हा वीज पुरवठा सुरळीत झाला नसल्याने पंपिंग स्टेशन बंद आहे. यामुळे शहराला आज शुक्रवार १९ फेब्रुवारी रोजी होणारा पाणीपुरवठा करता आलेला नाही. उच्च दाब वीज वाहिनी दुरुस्तीचे काम वितरण कंपनीतर्फे करण्यात येत आहे. यामुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. यात दि. १९ रोजी होणारा पाणीपुरवठा दि. २० रोजी तर दि. २० रोजीचा पाणीपुरवठा दि. २१ तसेच दि. २१ रोजीचा पाणीपुरवठा दि. २२ रोजी करण्यात येणार असल्याचे  शहर अभियंता यांनी कळविले आहे.

 

शनिवार २० फेब्रुवारी रोजी या भागात होईल पाणीपुरवठा 

वाल्मिकनगर, कांचननगर, दिनकर नगर, आसोदा रोड, रामेश्‍वर कॉलनी, हरिविठ्ठल नगर, पिंप्राळा गावठाण परिसर, दांडेकर नगर, मानराजपार्क, असावा नगर, निसर्ग कॉलनी, द्रौपदी नगर, मुक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलिस कॉलनी परिसर, खोटेनगर, गेंदालाल मिल, शिवाजीनगर हुडको, प्रजापत नगर, एस.एम.आयटी परिसर, योगेश्‍वर नगर, हिरापाईप, शंकरराव नगर, खेडीगांव परिसर, तांबापुरा, गणपती नगर, आदर्श नगर व इतर परिसर, विद्युत कॉलनी, राका पार्क, पोस्टल कॉलनी, विवेकानंद नगर व इतर भाग, आयोध्यानगर पहिला दिवस गृहकुल, म्हाडा कॉलनी, रायसोनी शाळा परिसर, अजिंठा हौ. सोसा. जगवानी नगर, मेहरूण पहिला दिवस सदाशिव नगर, रामनगर, रजा कॉलनी, अक्सा नगर, गणेशपुरी, मलिकनगर

रविवार २१ फेब्रुवारी रोजी भागात होईल पाणीपुरवठा 

खंडेराव नगर, दुसरा दिवस पिंप्राळा गावठाण, पिंप्राळा हुडको, सेंट्रल बॅंक कॉलनी, आशाबाबा नगर, पिंप्राळळाटाकी मानराज टाकी परिसर, शिंदे नगर, अष्टभुजा, वाटीकाश्रम परिसरातील राहिलेला भाग, निवृत्ती नगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा कॉलनी, आहुजानगर, निमखेडी राहिलेला भाग, नित्यानंदनगर, संभाजी नगर, रायसोनी नगर, समतानगर परिसरातील उर्वरित भाग, डीएसपी बायपास-तांबापुर, शामा फायर समोरील परिसर, डीएसपी टाकीवरून जिल्हा रोड, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, चैत्रवन कॉलनी, आनंद नगर, तिवारी नगर, बाहेती शाळा आदी. गिरणा टाकी आवारातील उंच टाकी, भगवाननगर, रामानंदनगर, कोल्हेनगर, अंबिका सोसायटी, शिवकॉलनी, गणेश कॉलनी व इतर परिसर

मेहरूण भागातील राहिलेला परिसर (बुस्टर पंप स. ४ वा.सुरु ) मेहरूण गावठाण, दत्तनगर, लक्ष्मी नगर, इकबाल कॉलनी, एकनाथ नगर, मंगलपुरी परिसर, आयोध्या नगर दुसरा दिवस – सद्गुरुनगर, हनुमान नगर, लीलापार्क , गौरव हॉटेल परिसर.

 

सोमवार २२ फेब्रुवारी रोजी या भागात होईल पाणीपुरवठा 

नटराज टाकी ते चौघुले मळा, शनीपेठ, बळीरामपेठ, शनीपेठ, नविपेठ, हौसिंग सोसायटी, प्रतापनगर, गेंदालाल मिल, खडके चाळ, इंद्रप्रस्थ नगर, के.सी.पार्क, गेंदालाल मिल हुडको, रिंगरोड, भोईटे नगर, भिकमचंद जैन नगर, आकाशवाणी, जुनेगांव, सिंधी कॉलनी, इंडिया गॅरेज, ओंकारनगर, जोशीपेठ, हेमुकलाणी टाकीवरील परिसर, गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्‍वर कॉलनी, वर्षा कॉलनी, सुप्रिम कॉलनी, डी.एस.पी. टाकीवरील सानेगुरुजी कॉलनी, पार्वती नगर, शिवराम नगर, यशवंत नगर प्ररीसारातील भाग, श्रद्धा कॉलनी, नंदनवन नगर, चर्चरोड, प्रभात कॉलनी, ब्रुकबॉण्ड कॉलनी, वाघ नगर,हरी विठ्ठल नगर, गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी परिसरातील भाग, समता नगर, स्टेट बँक कॉलनी, धांडे नगर आदी. मेहरूण इकबाल कॉलनी, मिल्लत नगर या भागात पाणीपुरवठा होणार आहे.

 

Protected Content