धरणगावातील जिनिंग व्यवसायिकांची मुख्यमंत्री सहायता निधीत एक लाख २१ हजाराची मदत

 

धरणगाव (वृत्तसंस्था) कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी मदत मिळावी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आज शहरातील जिनिंग व्यवसायिकांनी १ लाख २१ हजाराच्या मदतीचा धनादेश प्रांतधिकारी विनय गोसावी यांच्याकडे दिला.

 

राज्यातील करोनाचा विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करत आहेत. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत धरणगावातील जिनिंग व्यवसायिकांची मुख्यमंत्री सहायता निधीत एक लाख २१ हजाराची मदत धनादेश प्रांतधिकारी विनय गोसावी यांच्याकडे दिला. यावेळी तहसीलदार नितीनकुमार देवरे, माजी नगराध्यक्ष तथा जी.एस.ग्रुपचे संचालक सुरेशनाना चौधरी, जीवनअप्पा बयस, नगराध्यक्ष निलेश चौधरी, हरीश अग्रवाल, मुर्तजा शेठ, राजू महाजन, हरीश डेडीया, श्री. रावतोळे, सुभाष पाटील आदी उपस्थित होते.

 

निलेश चौधरीची नम्रता आणि अधिकाऱ्यांकडून सुरेशनानांचा आदर

 

शहरातील जिनिंग व्यवसायिकांनी १ लाख २१ हजाराच्या मदतीचा धनादेश प्रांतधिकारी विनय गोसावी यांच्याकडे देण्यासाठी आले, त्यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी हे प्रांतधिकारी व तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्यासोबत प्रशासकीय बैठकीत बसले होते. जिनिंग व्यावसायिकांचे शिष्टमंडळ येताच निलेश चौधरी यांनी आपल्या खुर्चीवरून उठले आणि शिष्टमंडळात आलेले आपले वडील सुरेशनाना व उद्योजक जीवनअप्पा बयस यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेत जिनिंग व्यावसायिक बांधवांमध्ये जावून बसले. हे बघून अधिकारी थोडे चकित झाले. त्यावर निलेश चौधरी यांनी दोघांना परिचर करून दिला. त्यावर प्रांतधिकारी श्री. गोसावी यांनी देखील नगराध्यक्षांची नम्रता बघून उद्योजक सुरेशनाना चौधरी यांना डायसवर बसण्यासाठी बोलावून सन्मान केला.

 

n2

 

Protected Content