दगडी दरवाजा जवळील गटार म्हणजे अपघाताचे माहेर

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील दगडी दरवाजा शेजारील चोपडा रस्त्यालगत असलेली भली मोठी गटार लहान मोठे अपघातांचे माहेर घर बनू पाहत आहे.

याठिकाणी दिवसागणिक अपघात होऊन जखमी होण्याच प्रमाण अधिक वाढताना दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे नगरपरिषद याकडे गांभीर्याने लक्ष देईल का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित होत आहे. जनतेचा जीव धोक्यात घालून नगरपरिषद बघ्याची भूमिका पार पाडत असल्याचा आरोप देखील केला जात आहे.

दरम्यान पुढील अनर्थ टाळण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने या उघड्या व अवाढव्य नाल्यावर धापे टाकून होणारे अपघात टाळावेत आणि शहरातील जनतेच्या मनात एक सकारात्मक स्थान निर्माण करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Protected Content