कोरोना’चे सावट…धरणगाव शहरातील घरांचे सर्वेक्षण !

धरणगाव (प्रतिनिधी) दोन दिवसांपूर्वी अमळनेर येथील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात काही जण आल्याची माहिती उघड झाली होती. याची गंभीर दखल घेत लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात सर्वेक्षणाचे काम युद्ध पातळीवर सुरु केले आहे.

 

जळगाव, अमळनेर आणि चोपडा तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. सुदैवाने मात्र, धरणागावात अद्याप एकही रुग्ण आढळून आलेला नाही. पालिका प्रशासन यासाठी विशेष खबरदारी घेत आहे. तशात आता अमळनेर येथील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात काही जण आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण शहरात सर्वेक्षणाचे काम सुरु केले आहे. यानुसार घरात किती व्यक्ती, कुणाला काही आजार, इतर लक्षणं यासह बाहेर गाव गेलेले आणि बाहेरून आलेल्या लोकांची माहिती घेतली जात आहे. नगराध्यक्ष निलेश चौधरी स्वतः या सर्वेक्षणाच्या दररोज आढावा घेणार आहेत. तसेच नागरिकांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन धरणगावकरांना केले आहे.

Protected Content