शिरसोली टायगर गृपतर्फे गरजूंना मोफत मास्कचे वाटप

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथील टायगर गृपचे सदस्य बंटी तडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास भील वस्तीत गरजूंना मास्कचे वाटप करण्यात आले.

सविस्तर असे की, तालुक्यातील शिरसोली येथील टायगर गृपचे सदस्य बंटी तडे यांचा आज सोमवारी ५ मे रोजी वाढदिवसानिमित्त गावातील भील वस्तीतील समाज बांधवांना मोफत मास्कचे वाटप करण्यात  आले. यावेळी टायगर गृप महाराष्ट्रचे अध्यक्ष पैलवाना तानाजी जाधव , टायगर गृप खान्देशचे अध्यक्ष ऋषीकेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर गृप शिरसोली शाखेचे सदस्य बंटी तडे यांच्या वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी गरीब व होतकरू नागरीकांना कोरोना महामारीची साखळी तोडण्यासाठी मास्कचे वाटप करण्यात आले. दरम्यान गृपच्या सदस्यांनी कोरोना जनजागृतीही करण्यात आली.  

कार्यक्रम यशस्वितेसाठी गृपचे सदस्य मोहन ठाकरे, कुणाल बारी, हर्षल सुरवाडे, फिरोज तडवी, गणेश वानखेडे, हेमंत पाटील, गौरव उमप, मनोज बाविस्कर; आदिंनी परिश्रम घेतले होते

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.