आदर्श शिक्षक स.ध. भावसार यांनी केला पोलिसांचा सत्कार

पारोळा प्रतिनिधी । पोलीस दलात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील तब्बल नऊ जणांना पोलीस महासंचालक पदक/ बोधचिन्ह जाहीर झाले असून त्यात पारोळा पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश पाटील यांचाही समावेश असल्याने पारोळा पोलीस ठाण्याचे नाव राज्य स्तरावर बऱ्याच वर्षांनंतर झळकले. या अभिमानाने आदर्श शिक्षक स.द. भावसार यांनी महेश पाटील यांचा विशेष सत्कार केला आहे. 

दरम्यान, येथील गुण ग्राहक व्यक्तिमत्व राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांना एक शहरवासी नागरिक म्हणून विशेष आनंद व अभिमान वाटल्याने त्यांनी पो.हे.का. महेश पाटील यांना आपल्या निवासस्थानी बोलावून शाल, श्रीफळ, पुष्पहार व अभिनंदन पत्र देऊन भावपूर्ण सत्कार केला आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

महेश पाटील हे अमळनेर तालुक्यातील रहिवासी असून पोलीस दलात जनहित लक्षात घेऊन २० वर्षे प्रामाणिकपणे, जबाबदारीने, निष्ठेने व उत्तम प्रकारे सेवा बजावली आहे. यामुळेच सतत १५ वर्षे त्यांचे उत्तम सेवा अभिलेख आहेत. महेश पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे सह पारोळा ठाण्याचे निरीक्षक संतोष भंडारे स.पो.नि.श्री गायकवाड,स.पो.नि. रवींद्र बागुल उपनिरीक्षक यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहनाबद्दल आभार व्यक्त करुन भावसार सरांना धन्यवाद दिले !

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.